दुबई : श्रीलंकेचा ऑफ-स्पिनर अकिला धनंजयावर गोलंदाजीच्या अवैध शैलीप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निलंबनाची कारवाई केली आहे.गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धनंजयावर संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचा ठपका ठेवण्यात आला. इंग्लंडने या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले होते.ब्रिस्बेन येथे धनंजयाच्या गोलंदाजीच्या शैलीची चाचणी घेण्यात आली. यात ‘आयसीसी’च्या नियमानुसार १५ अंशांच्या कोनाचे त्याच्याकडून उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निलंबित करण्यात आले.