26 October 2020

News Flash

ICC T20I Ranking : राहुल-रोहित जोडीची क्रमवारीत मोठी झेप

विराट नवव्या स्थानावर कायम

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत ५-० ने विजय मिळवला. न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली. याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये ५ सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉश देण्याचा पराक्रम करणारा भारत हा एकमेव संघ ठरला आहे. भारताकडून फलंदाजीत लोकेश राहुल तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर यांनी चमक दाखवली.

लोकेश राहुलने या मालिकेत २०० पेक्षा जास्त धावा करत मालिकावीराचा किताबही पटकावला. रोहित शर्मानेही अखेरच्या सामन्यात ६० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीचा त्यांना आयसीसीच्या क्रमवारीत फायदा झालेला दिसत आहे. लोकेश राहुलने सहाव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. तर रोहित शर्माच्या स्थानातही सुधारणा झालेली असून तो दहाव्या स्थानावर आला आहे.

याव्यतिरीक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नववं स्थान कायम राखलं आहे. टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2020 1:55 pm

Web Title: icc t20i ranking lokesh rahul and rohit sharma position increase in ranking virat maintain his position psd 91
Next Stories
1 U-19 World Cup : उपांत्य सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर, विजयाची संधी कोणाला??
2 संजय मांजरेकरांकडून विराट कोहलीची इम्रान खानशी तुलना
3 सायना अव्वल बॅडमिंटनपटूला हरवू शकते? गोपीचंद म्हणतात…
Just Now!
X