इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारतीय संघाचं आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतलं स्थान सुधारलेलं आहे. इंग्लंडवरील विजयानंतर भारतीय संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर दुसरीकडे झिम्बाब्वेत झालेल्या तिरंगी मालिकेत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर मात करणारा पाकिस्तानचा संघ १३२ गुणांसह अजुनही अव्वल स्थानावर कायम आहे. भारताच्या खात्यात सध्या १२४ गुण आहेत.

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना झाल्यानंतर आयसीसीने आपली नवीन यादी जाहीर केली आहे. आयसीसीची नवीन क्रमवारी पुढीलप्रमाणे असेल –

अवश्य वाचा – लोकेश राहुलची हनुमान उडी! टी-२० क्रमवारीत पटकावलं तिसरं स्थान

१) पाकिस्तान – १३२ गुण

२) भारत – १२४ गुण

३) ऑस्ट्रेलिया – १२२ गुण

४) इंग्लंड – ११७ गुण

५) न्यूझीलंड – ११६ गुण

६) दक्षिण आफ्रिका – ११४ गुण

७) वेस्ट इंडिज – ११४ गुण

८) अफगाणिस्तान – ९१ गुण

९) श्रीलंका – ८५ गुण

१०) बांगलादेश – ७० गुण