News Flash

ICC RANKINGS : न्यूझीलंडचा विश्वविजेत्या इंग्लंडला ‘दे धक्का’, वनडेत पटकावले अव्वल स्थान

वनडे क्रमवारीत विराटसेनेची घसरण

फोटो सौजन्य : ट्विटर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे, मात्र वनडे क्रमवारीत भारताला तोटा सहन करावा लागला आहे. वनडेमध्ये भारताची एका स्थानाने घसरण झाली असून ते तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. न्यूझीलंडने विश्वविजेत्या इंग्लंडला धक्का देत वनडेत पहिले स्थान मिळवले आहे.

 

आज सोमवारी ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. न्यूझीलंडने दोन स्थानांची कमाई केली असून एकूण त्यांच्या खात्यात आता १२१ गुण झाले आहेत. नवीन अपडेटनुसार, मे २०२० नंतर खेळलेले सर्व सामने १०० टक्के ठेवण्यात आले आहेत, तर मागील दोन वर्षांच्या सामन्यांचे गुण ५० टक्के ठेवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया ११८ गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारत आणि इंग्लंड या दोन संघाचे ११५ गुण आहेत, पण दशांश अंकात चांगली कामगिरी केल्यामुळे भारत तिसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंडचा संघ आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

टी-२० क्रमवारीत इंग्लंड अव्वल

टी-२० क्रमवारीत इंग्लंडने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. इंग्लंडच्या खात्यात २७७ ​​गुण आहेत, तर भारत इंग्लंडपेक्षा पाच गुणांनी मागे आहे. टी-२० क्रमवारीत न्यूझीलंडलाही फायदा झाला आहे. किवी संघ पाचव्या क्रमांकावरुन तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. या कालावधीत न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिज, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसर्‍या क्रमांकावरुन पाचव्या स्थानावर घसरला आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश एक स्थान मिळवून अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. दोन स्थानांच्या नुकसानामुळे वेस्ट इंडिजचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीतील अपडेटमध्ये २०१७-१८चे निकाल समाविष्ट नाहीत. २०१९-२० या वर्षात खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या आधारावर ही क्रमवारी तयार करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 10:52 pm

Web Title: icc team rankings india remain at number two in t20 slipped down in odis adn 96
Next Stories
1 पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला!
2 IPL २०२१ बंद होणार? BCCIच्या अधिकाऱ्यानं दिलं ‘हे’ उत्तर
3 IPL २०२१ : दिल्लीच्या मैदानात काम करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
Just Now!
X