भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान कायम राहिलेलं आहे. आयसीसीने शुक्रवारी जाहीर केलेल्या यादीत, विराट ९२८ गुणांसह पहिल्या स्थानी कायम असून, भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा होऊन तो आठव्या स्थानी आलेला आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. न्यूझीलंडचा दौरा हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या मालिकेत विराट कोहलीसह भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.
अशी आहे आयसीसीची कसोटी क्रमवारी –
१) विराट कोहली – ९२८ गुण
२) स्टिव्ह स्मिथ – ९११ गुण
३) मार्नस लाबुशेन – ८२७ गुण
४) केन विल्यमसन – ८१४ गुण
५) डेव्हिड वॉर्नर – ७९३ गुण
६) चेतेश्वर पुजारा – ७९१ गुण
७) बाबर आझम – ७६७ गुण
८) अजिंक्य रहाणे – ७५९ गुण
९) जो रुट – ७५२ गुण
१०) बेन स्टोक्स – ७४५ गुण
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2020 3:00 pm