न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाला सामोरं जावं लागलं. वेलिंग्टन आणि ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब झाली. दिग्गज फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करु न शकल्यामुळे भारत मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. भारतीय गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्टा केली…मात्र त्यांना फलंदाजांनकडून योग्य ती साथ लाभली नाही. मात्र कसोटी क्रमवारीत भारतीय गोलंदाजांना चांगला फायदा झालेला दिसतोय.

जसप्रीत बुमराहने या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली असून, त्याचं स्थान चार अंकांनी वधारलं आहे. याचसोबत भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणत मालिकावीराचा किताब मिळवणारा न्यूझीलंडचा टीम साऊदीही चौथ्या स्थानावर पोहचला आहे.

या दोन गोलंदाजांव्यतिरीक्त अखेरच्या कसोटी सामन्यात भेदक मारा करणाऱ्या ट्रेंट बोल्टनेही सर्वोत्तम दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवलं असून तो नवव्या स्थानी पोहचला आहे. दरम्यान कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – BLOG : राईचा पर्वत करायचा नाही पण…