18 March 2019

News Flash

अश्विन क्रमवारीत चौथ्या स्थानावर

दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने ९०० गुणांचा पल्ला ओलांडत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

लोकसत्ता टीम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या आर. अश्विनने दोन स्थानांच्या सुधारणेसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाने ९०० गुणांचा पल्ला ओलांडत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

रबाडाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून ११ बळी टिपले आणि त्याच्या या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने सहा विकेट राखून विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी घेतली. रबाडाला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. याच खेळाच्या जोरावर रबाडाने अव्वल स्थानावर झेप घेतली. ९०० गुणांचा टप्पा ओलांडणारा रबाडा हा २३वा, तर आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरला. रबाडापूर्वी वेर्नोन फिलँडर (९१२ गुण २०१३), शॉन पोलॉक (९०९ गुण १९९९) आणि डेल स्टेन (९०९ गुण २०१४) यांनी ही कामगिरी केली आहे.

दरम्यान, भारत कसोटी सामना खेळत नसला तरी अश्विनने दोन स्थान वर झेप घेतली आहे. आफ्रिकेकडून झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांची क्रमवारीत झालेली घसरण अश्विनच्या पथ्यावर पडली. भारताचा रवींद्र जडेजा तिसऱ्या स्थानावर कायम आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ अव्वल स्थानावर कायम आहे, तर भारताचा कर्णधार विराट कोहलीही तिसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी’व्हिलियर्सने शतकी खेळीच्या जोरावर पाच स्थानांची झेप घेत सातवे स्थान पटकावले.

((   आर. अश्विन ))

First Published on March 14, 2018 2:39 am

Web Title: icc test rankings ashwin reaches fourth