News Flash

कसोटी क्रमवारीत उमेश यादवची ‘पंचवीशी’; ऋषभ पंत-पृथ्वी शॉलाही फायदा

भारत पहिल्या स्थानावर कायम

वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर आनंद व्यक्त करताना उमेश यादव व सहकारी

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 ने विजय मिळवल्याचा भारतीय संघाचा चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी क्रमवारीत भारताने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. याचसोबत दुसऱ्या कसोटीत 10 बळी घेणारा उमेश यादव, फलंदाजीत चमक दाखवलेले नवोदीत पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनाही कसोटी क्रमवारीत फायदा झालेला आहे.

उमेश यादव कसोटी क्रमवारीत 25 व्या स्थानावर पोहचला आहे. एका कसोटीत 10 बळी घेण्याच्या कामगिरीचं फळ त्याला मिळालेलं असल्याचं दिसतं आहे. एका कसोटीत 10 बळी घेणारा उमेश तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी जवागल श्रीनाथ आणि कपिल देव यांनी अशी कामगिरी केली आहे. याचसोबत राजकोट कसोटीत शतक आणि हैदराबाद कसोटीत अर्धशतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉची क्रमवारीत 73 व्या स्थानावरुन 60 व्या स्थानावर बढती झाली आहे. ऋषभ पंतला दोन्ही कसोटीत शतकाने हुलकावणी दिली होती, त्याच्या या कामगिरीने पंतला क्रमवारीत 62 वं स्थान मिळालं आहे.

आयसीसीची कसोटी क्रमवारी पुढीलप्रमाणे –

1) भारत – 116 गुण
2) दक्षिण आफ्रिका – 106 गुण
3) ऑस्ट्रेलिया – 106 गुण
4) इंग्लंड – 105 गुण
5) न्यूझीलंड – 102 गुण
6) श्रीलंका – 97 गुण
7) पाकिस्तान – 88 गुण
8) वेस्ट इंडिज – 76 गुण
9) बांगलादेश – 67 गुण
10) झिम्बाब्वे – 2 गुण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 4:14 pm

Web Title: icc test rankings prithvi shaw rishabh pant make gains umesh yadav enters top 25
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : जाणून घ्या आतापर्यंतचे सर्वोत्तम 5 चढाईपटू
2 Youth Olympics : भारतीय युवा हॉकीला चंदेरी यश
3 #MeToo च्या दणक्यानंतर BCCIच्या राहुल जोहरींना आणखी एक धक्का
Just Now!
X