आगामी विश्वचषक २०१५च्या अनुशंगाने आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) सामन्यांवरील सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील पोलिस आणि तेथील विशेष पथकाबरोबर एक करार करण्यात आला आहे. असे आयसीसी विश्वचषक २०१५चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या क्रिकेटला स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी प्रकणाचा बट्ट्या लागला आहे. अशा प्रकरणात खेळाडू, पंच आणि अधिकाऱयांचेही नावे समोर आली आहेत. विश्वचषक म्हटले की, यात तितकीच मोठी सट्टेबाजी, स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाज खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी सक्रीय होतील. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन डेव्हिज रिचर्डसन म्हणाले, यावेळी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया पोलिसांबरोबर एक करार करण्यात आला आहे. याआधीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भ्रष्टाचार-विरोधी पथक असायचे. हे पथकाचे सर्व सट्टेबाजी प्रकरणावर लक्ष असायचे. यावेळेस करारानुसार न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांची सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. त्यानुसार अशा सट्टेबाज प्रवृत्तींकडे करडी नजर ठेवण्यात मदत होईल असेही डेव्हिड रिचर्डसन म्हणाले.