News Flash

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला शुभेच्छा देत ICCने काढली धोनीची कळ!

भारतीय चाहत्यांनी ICCला केले ट्रोल

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल बेव्हन आज आपला ५१वा वाढदिवस साजरा करीत आहे. या खास दिवशी आयसीसीने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या दिग्गज फलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या शुभेच्छा देताना आयसीसीने टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला ट्रोल केले आहे.

आयसीसीने मायकेल बेव्हनचा फोटो पोस्ट करत लिहिले, ”ओरिजनल मॅच फिनिशर मायकेल बेव्हनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” धोनीला मॅच फिनिशर म्हटले जाते. मात्र, आयसीसीने मायकेल बेव्हनला ओरिजनल मॅच फिनिशर म्हणत धोनीची कळ काढली आहे. या ट्विटवर भारतीय चाहत्यांनी आयसीसीला ट्रोल केले आहे.

 

वाचा चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

मायकेल बेव्हनची कारकीर्द

मायकेल बेव्हनने २३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३.७८च्या सरासरीने ६९१२ धावा केल्या आहेत. मायकेल बेव्हन ६७ वेळा नाबाद राहिला आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये ६ शतके आणि ४६ अर्धशतके झळकावली आहेत. १९९९ आणि २००३ विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो महत्वाचा सदस्य राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 6:48 pm

Web Title: icc tries to cheekily troll ms dhoni by giving birthday wishes to michael bevan adn 96
Next Stories
1 IPLच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी श्रीलंका उत्सुक
2 VIDEO : जोफ्रा आर्चरच्या ‘Banana स्विंग’ गोलंदाजीमुळे फलंदाजही झाला चकित!
3 KKRचा जलदगती गोलंदाज प्रसिध कृष्णाला करोनाची लागण
Just Now!
X