News Flash

श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यावर ICCने केले भ्रष्टाचाराचे आरोप

भ्रष्टाचाराच्या आरोपासंबंधी ICCने सनथ जयसूर्याकडून मागवलं स्पष्टीकरण

श्रीलंकेचा तडाखेबाज माजी सलामीवीर सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे दोन आरोप करण्यात आले आहेत. ICCने या संबधी ट्विट करून हि माहिती दिली आहे. ICCच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने जयसुर्यावर गंभीर आरोप केले असून त्याला स्पष्टीकरण देण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली आहे.

ICCचे भ्रष्टाचारविरोधी पथक जयसूर्याची चौकशी करायला गेले होते. त्यावेळी जयसूर्या श्रीलंकेच्या निवड समितीचा अध्यक्ष होता. त्यावेळी जयसूर्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला चांगली वागणूक दिली नव्हती. त्यांच्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांना त्याचे काम निःपक्षपातीपणे करू देत नव्हता. त्यामुळे ICCच्या 2.4.6 या कलमानुसार जयसूर्यावर भ्रष्टाचारविरोधी पथकाला मदत न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर कलम 2.4.7नुसार कारवाईमध्ये बाधा आणण्याचा आरोपही या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 6:16 pm

Web Title: icc tweets about sanath jayasuriya charged for breaching iccs anti corruption code
Next Stories
1 १८ वर्षाचे असताना आमचा खेळ पृथ्वी शॉच्या १०% टक्केही नव्हता – विराट कोहली
2 ‘मेसी सामन्याआधी २० वेळा टॉयलेटला जातो’; दिग्गज फुटबॉलपटू मॅरोडोनाची विखारी टीका
3 कसोटी क्रमवारीत उमेश यादवची ‘पंचवीशी’; ऋषभ पंत-पृथ्वी शॉलाही फायदा
Just Now!
X