News Flash

U-19 World Cup 2018 – झिम्बाब्वेवर मात करत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक

शुभमन गिलची आक्रमक खेळी

U-19 World Cup 2018 – झिम्बाब्वेवर मात करत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक
९० धावांची खेळी करुन भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा शुभमन गिल

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या U-19 विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आपला अखेरचा साखळी सामना खेळणाऱ्या भारताने दुबळ्या झिम्बाब्वेवर १० गडी राखून मात केली. याआधी भारतीय संघाने साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीआ संघांना पराभवाचा धक्का दिला होता.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघाला भारतीय आक्रमणाला तोंड देता आलं नाही. भारताचा डावखुरा फिरकीपटू अनुकूल रॉयने २० धावांच्या मोबदल्यात ४ फलंदाजांना माघारी धाडलं. अभिषेक शर्माने २२ धावांत २ बळी मिळवले. गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे झिम्बाब्वेचा संघ ४८.१ षटकात १५४ धावांत गारद झाला.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने झिम्बाब्वेचं आव्हान सहज पार केलं. सलामीवीर शुभमन गिल आणि हार्विक देसाईने अर्धशतकी खेळी करुन भारताला विजय मिळवून दिला. शुभमनने ५९ चेंडूत ९० धावांची खेळी केली तर हार्विक देसाईने ७३ चेंडुत ५६ धावांची खेळी केली. झिम्बाब्वेने दिलेलं आव्हान भारताने २१.४ षटकांमध्ये पूर्ण केलं. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने स्वतः भारतीय संघाच्या डावाची सुरुवात न करता इतर फलंदाजांना फलंदाजीचं कौशल्य आजमावण्याची संधी दिली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2018 2:31 pm

Web Title: icc u 19 world cup 2018 new zealand india secure their birth in quarter final match as they defeat zimbabwe in last group match
Next Stories
1 संधी द्यायची नव्हती मग अजिंक्य रहाणेला उप-कर्णधार का बनवलंत? – बिशनसिंह बेदी
2 निधास चषक २०१८ – जाणून घ्या भारत-बांगलादेश-श्रीलंका तिरंगी मालिकेचे वेळापत्रक
3 प्रो-कबड्डीच्या सहाव्या आणि सातव्या हंगामाची तारीख ठरली, ३ महिने रंगणार कबड्डीचा थरार
Just Now!
X