अंडर १९ वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरोधात शुभमन गिलने शतक ठोकले. शुभमन गिलच्या शतकाने भारताच्या विजयाचा पाया रचला. ‘माझ्या खेळीचे श्रेय मी वडील आणि भावालाच देईन’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्याने दिली आहे. तर या सामन्यासाठी भारताचा गेम प्लान काय होता, याचा उलगडा खुद्द कर्णधार पृथ्वी शॉनेच केला.
अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये शुभमन गिलच्या शतकाच्या आधारे भारताने २७२ धावा केल्या. पाकिस्तानचा डाव अवघ्या ६९ धावांमध्ये गुंडाळून भारताने दिमाखात फायनलमध्ये धडक दिली. शतकवीर शुभमन गिल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामन्यानंतर शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, या खेळीचे श्रेय माझ्या वडिलांनाच देईन. मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानसारख्या संघाविरोधातील ही खेळी मला नेहमीच लक्षात राहणार, असे त्याने सांगितले. या मैदानावर पहिले फलंदाजी करताना २५० – २६० धावांचा आकडा पुरेसा होता. आता मला क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळायचे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल मॅचकडे मी लक्ष केंद्रीत केले आहे, असे त्याने सांगितले.
भारताचा कर्णधार पृथ्वी शॉने देखील या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, संघाने आज चांगली कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात आमची कामगिरी चांगली झाली. भारत – पाक सामन्याचे दडपण दोन्ही संघाच्या खेळाडूंवर होते. तुमची रणनिती काय होती, असा प्रश्न विचारला असता शॉ म्हणतो, खेळपट्टी पाहता गोलंदाजाकडून चूक होण्याची वाट पाहत होतो. संधी मिळताच चौकार मारायचा, हीच आमची रणनिती होती, असे त्याने सांगितले. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी गाठ असून आमच्यासाठी हा सामना एक आव्हान आहे. आता फायनलमधील कामगिरीवर आमचे लक्ष असेल, असे त्याने सांगितले.
India's #FutureStars applaud their fantastic fans that cheered them into the #U19CWC Final!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2018 10:11 am
Web Title: icc under 19 world cup reaction of indias shubman gill captain prithvi shaw after beating pakistan in semi final game plan