मुंबईतील एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्युअल्सला बाद केल्यानंतर आक्रमक पद्धतीने आनंद साजरा करणारा भारताचा युवा वेगवान गोलंदाज खलील अहमदला तंबी देण्यात आली आहे. याचप्रमाणे त्याच्या खात्यावर गैरवर्तणुकीचा गुणही जमा झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेमधील पहिल्या स्तरावरील कलमांचे अहमदने उल्लंघन केले आहे. अहमदने १४व्या षटकात सॅम्युअल्सला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. यावेळी त्याच्या आक्रमक वृत्तीबाबत मैदानावरील पंचांनी दखल घेतली. अहमदने कलम क्रमांक २.५चे उल्लंघन केले आहे.