मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि न्यूझीलंडमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीचा सामना सुरु आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना वेळेवर सुरु झाला असला तरी दुसऱ्या डावात म्हणजे भारताची फलंदाजी सुरु असताना पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे.

संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ८० टक्के आहे. त्यामुळे भारत धावांचा पाठलाग करत असताना काहीवेळासाठी खेळ थांबवला जाऊ शकतो. वेधशाळेच्या अंदाजानुसार आज मँचेस्टरमध्ये ढगाळ हवामान असेल तसेच अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतील.

मँचेस्टरमध्ये कमाल तापमाना २० डिग्री राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर बुधवारचा दिवस राखून ठेवण्यात आला आहे. बुधवारीही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर गुणतक्त्यात भारत अव्वल स्थानी असल्यामुळे टीम इंडिया अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.