26 February 2020

News Flash

WC 2019 Video : …आणि मैदानातच पंचांनी मारले ‘पुश-अप्स’

अफगाणिस्तानची फलंदाजी सुरु असताना घडला प्रकार

यजमान इंग्लंडने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजीच्या जोरावर ३९७ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार मॉर्गनच्या १४८ धावा आणि सलामीवीर बेअरस्टो (९०), जो रूट (८८) यांची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानला ३९८ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात कर्णधार ऑईन मॉर्गन याने तुफानी खेळी केली.

या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने अत्यंत सावध आणि संथ सुरुवात केली. ४ धावसंख्येवर त्यांनी पहिला डाव गमावला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी अफगाणिस्तानने चांगली भागीदारी केली. या दरम्यान ९ षटकांचा खेळ झाला. त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर बसलेले राखीव पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी थेट ‘पुश-अप्स’ मारून दाखवल्या. त्यांच्या कृत्याच्या मागचे कारण कळू शकले नाही. परंतु राखीव पंच असल्याने कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी असे केले असल्याची चर्चा काही काळ रंगली होती.

त्याआधी, सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ४४ धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. ९० धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. जो रुटने आपली खेळी चालू ठेवली आणि कर्णधार मॉर्गनच्या साथीने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने खेळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. त्याने तुफानी फटकेबाजी करत केवळ ५७ चेंडूत १०० धावांचा पल्ला गाठला. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार यांच्या मदतीने ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने ४ षटकार आणि १ चौकार खेचत ९ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आणि संघाला ५० षटकात ६ बाद ३९७ धावांची मजल मारून दिली.

अफगाणिस्तानकडून दौलत झादरान आणि गुलाबदिन नैब या दोघांनी ३ -३ गडी बाद केले.

First Published on June 18, 2019 10:13 pm

Web Title: icc world cup 2019 eng vs afg umpire bruce oxenford push ups vjb 91
Next Stories
1 Video : कॅप्टन मॉर्गनचा धमाका! पहा ‘ते’ १७ षटकार
2 World Cup 2019 : अरेरे! रशीद खानच्या नावे झाला नकोसा विक्रम
3 World Cup 2019 : मॉर्गन नवा ‘सिक्सर किंग’; १७ षटकारांसह मोडला रोहितचा विक्रम
Just Now!
X