World Cup 2019 या स्पर्धेसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये आहे. ३० मे पासून या स्पर्धेतील मूळ सामन्यांना सुरुवात होणार आहे. या संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. त्याशिवाय चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली. सर्वच खेळाडू सराव करत आहेत. पण याबरोबरच काही विरंगुळ्याचे क्षणदेखील टीम इंडियाचे खेळाडू अनुभवताना दिसत आहेत.

सध्या इंग्लंडच्या विश्वचषक स्पर्धेसह आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगली आहे. ती गोष्ट म्हणजे steady hand challenge. एका नागमोडी आकाराच्या इलेक्ट्रोफाईड पाईपमधून चलाखीने एक वस्तू फिरवणे आणि त्याचा स्पर्श त्या पाईपला होऊ न देणे असा हा चॅलेंज आहे. हा चॅलेंज भारताच्या जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या २ खेळाडूंमध्ये रंगला. या खेळात काय झाले ते पहा –

याआधी रोहित शर्मा यानेही हा चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने चांगला प्रयत्न केला होता. त्याने बुमराह आणि हार्दिकपेक्षाही पुढपर्यंत मजल मारली होती. पण त्यालाही चॅलेंज पूर्णत्वास नेता आले नव्हते.

दरम्यान, न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाला केवळ १८० धावा केल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंडने ४ गडयांच्या मोबदल्यात पूर्ण केले.