दुबळ्या अफगाणिस्तानचा पराभव करत दक्षिण आफ्रिका संघानं विश्वचषकात अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. सलग तीन पराभव आणि पावसामुळे एक लढत रद्द झाल्यानं दक्षिण आफ्रिकेचा पाय खोलात गेला होता. मात्र, आफगाणिस्तानचा पराभव करत दक्षिण आफ्रिका संघान या विश्वचषकातील अव्हान जिवंत ठेवलं आहे. सध्या दक्षिण आफ्रिका संघाच्या नावावर तीन गुण झाले आहेत.

कार्डिफ येथे शनिवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नवख्या आफगाणिस्तानला फक्त १२५ धावांत गारद केलं. इम्रान ताहिरच्या गोलंदाजीपुढे आफगाणिस्तानचा संघ ५० षटकेही तग धरू शकला नाही. इम्रान ताहिरनं २९ धावांत ४ गडी बाद केले.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना अफगाणिस्तानला हरजतुल्लाह झझाई (२२) व नूर अली झदरान (३२) यांनी ८.२ षटकांत ३९ धावांची सलामी देत सावध सुरुवात करून दिली. मात्र, हे दोघे ऐकापाठोपाठ बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव गडगडला. अखेरच्या षटकांत राशिद खानने ३५ धावा करत संघाला शंभरी पार नेहलं. दक्षिण आफ्रिकेकडून इम्रान ताहीरने ४ आणि ख्रिस मॉरिसने ३ बळी मिळवलं.

१२६ धावांचा पाठलाग दक्षिण आफ्रिका संघानं ९ गडी राखून सहजासहजी केला. आफ्रिकेकडून सलामी फलंदाज डिकॉकनं सर्वाधिक ६८ धावा केल्या.