भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याने प्रथम ‘टीम इंडिया’ला फलंदाजासाठी आमंत्रित केले. पावसाच्या अंदाजामुळे भारतीय कर्णधार कोहली त्यालादेखील प्रथम गोलंदाजीचा निर्णय घ्यायचा होता. पण नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान या ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यात शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी अखेर अष्टपैलू विजय शंकर याला संघात स्थान देण्यात आले आहे.

रोहित शर्माने सामन्यात दमदार खेळी केली. रोहितने या सामन्यात लगावलेल्या एका षटकारामुळे २००३ साली विश्वचषक स्पर्धेतील सचिनच्या षटकाराच्या आठवणी जागा झाल्या. ८५ धावांवर खेळत असताना रोहितने हसन अली याला षटकार खेचला.

हा पहा व्हिडीओ –

हा षटकार अगदीउ त्याच प्रकारच्या षटकाराची आठवण करून देणारा ठरला जो षटकार सचिन तेंडुलकर याने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर खेचला होता.

हा पहा व्हिडीओ –

दोन सामन्यांत फरक केवळ इतकाच ठरला की सचिन त्या सामन्यात ९८ धावांवर बाद झाला, पण रोहितने मात्र आपले शतक पूर्ण केले.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. पण तिसरा सामना मात्र पावसामुळे वाया गेला. त्या सामन्यात शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात या प्रश्नावर उत्तर मिळाले आणि विजय शंकरला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली.