विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात विंडिजच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची दमदार धुलाई केली. एव्हिन लुईस, शाय होप आणि शिमरॉन हेटमायर या तिघांच्या अर्धशतकाने विंडिजचा डाव खुलला आणि बहरला. पण या सामन्यात चर्चेचा ठरला तो निकोलस पूरनचा दमदार षटकार…

३० व्या षटकात मेहिदी हसन मिराज हा गोलंदाजीची आला. त्यावेळी पूरन केवळ १२ धावांवर खेळत होता. षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर मेहिदीच्या गोलंदाजीवर पूरनने एक भन्नाट असा उत्तुंग षटकार लगावला. हा षटकार याब्ब्ल ८९ मीटर उंच आणि लांब गेला. पण हा षटकारा चर्चेचा विषय ठरला कारण षटकाराच्या वेळी चेंडू जाऊन थेट स्टेडियमच्या कौलावर जाऊन पडला. फटका इतका जोरदार होता की त्यामुळे स्टेडियममधील कौलदेखील फुटले.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर ख्रिस गेल हा शून्यावर परतला. त्याने १३ चेंडू खेळले. पण त्यानंतर एव्हीन लुईसने डावाचा ताबा घेतला आणि शाय होपच्या साथीने डाव सावरला. लुईसने संयमी अर्धशतक केले. पण मोठा फटका मारताना तो ६७ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचले. निकोलस पूरनने फटकेबाजीला सुरुवात केली होती, पण तो २ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३० चेंडूत २५ धावा काढून तो बाद झाला. शिमरॉन हेटमायरने मात्र होपला चांगली साथ दिली. त्याने दमदार अर्धशतक ठोकले. २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार खेचत त्याने ५० धावा केल्या.