06 July 2020

News Flash

पाकिस्तान विजयी

हरहुन्नरी सलामीवीर अहमद शहजादने साकारलेल्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव केला.

| March 31, 2014 12:02 pm

हरहुन्नरी सलामीवीर अहमद शहजादने साकारलेल्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव केला. आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेतील दुसऱ्या विजयानिशी पाकिस्तानने स्पध्रेतील उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या. परंतु सलग तिसऱ्या पराभवामुळे यजमान बांगलादेशचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे या स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करू शकेल.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ५ बाद १९० अशी भक्कम धावसंख्या उभारली. याचे श्रेय शहजादने ९८ चेंडूंत केलेल्या नाबाद १११ धावांना द्यावे लागेल. उमर गुल व सईद अजमल यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे बांगलादेशला ७ बाद १४० धावा करता आल्या.  

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १९० (अहमद शहजाद नाबाद १११; अब्दुर रझाक २/२०) विजयी वि. बांगलादेश : २० षटकांत ७ बाद १४० (शाकीब अल हसन ३८, नासिर हुसेन २३; उमर गुल ३/४०). सामनावीर : अहमद शहजाद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2014 12:02 pm

Web Title: icc world t20 2014 pakistan rout bangladesh to keep semis hope alive
टॅग Bangladesh,Pakistan
Next Stories
1 प्राप्तिकर खात्याकडून महेंद्रसिंग धोनीच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची शक्यता
2 भारतासाठी कांगारू स्वस्त
3 ..आहे सुनील मनोहर तरी!
Just Now!
X