News Flash

ICC World T20:  भारत-पाक सामन्यावेळी ‘बिग बी’ राष्ट्रगीत गाणार

सौरव गांगुलीने 'बिग बीं'ना यासाठी गळ घातल्याचे सूत्रांनी सांगितले.

| March 16, 2016 02:23 pm

amitabab bachchan

तमाम क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागून राहिलेला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना आणखी एका कारणामुळे विशेष ठरणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यावेळी बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गाणार आहेत. अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्विटरवरून या बातमीला दुजोरा दिला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएनशच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या सौरव गांगुलीने ‘बिग बीं’ना यासाठी गळ घातल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशन अमिताभ यांच्या संपर्कात होती. एकीकडे अमिताभ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात भारताचे राष्ट्रगीत गाणार आहेत. तर, दुसरीकडे शास्त्रीय गायक शफकत अमानत अली पाकिस्तानचे राष्ट्रगीत गाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 2:23 pm

Web Title: icc world t20 amitabh bachchan to sing national anthem before india pakistan match
टॅग : Ind Vs Pak
Next Stories
1 आफ्रिदी, भारताला षटकार कसे मारतात ते दाखव; ‘मौका मौका’ ची नवी जाहिरात
2 चौथ्या फेरीत कर्जाकिनचा आनंदवर सनसनाटी विजय
3 आशियाई ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर
Just Now!
X