ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या मुख्य फेरीला सामोरे जाण्यापूर्वी प्रत्येक संघ आपापल्या चमूतील बलस्थाने चाचपडून पाहण्यासाठी सज्ज झाले आहेत. गुरुवारी कोलकाता येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या रंगीत तालिमेचा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यावरील ट्वेन्टी-२० मालिकेतील निभ्रेळ यशानंतर आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाची विश्वचषकासाठी मजबूत संघबांधणी झालेली आहे. तरीही या लढतीत मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सर्वाच्या नजरा असतील. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता आणि विश्वचषकाच्या दृष्टीने त्याची तंदुरुस्ती महत्त्वाची आहे.