News Flash

मोठय़ा विजयाचे न्यूझीलंडचे लक्ष्य

विजयाची गाडी रूळावर आणण्यासाठी आणि दुसऱ्या विजयासह एकूण सरासरीत वाढ करण्याची संधी न्यूझीलंडला मिळणार आहे. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत दुबळ्या नेदरलँड्सविरुद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडने

| March 29, 2014 02:14 am

विजयाची गाडी रूळावर आणण्यासाठी आणि दुसऱ्या विजयासह एकूण सरासरीत वाढ करण्याची संधी न्यूझीलंडला मिळणार आहे. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत दुबळ्या नेदरलँड्सविरुद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडने मोठय़ा विजयाचे उद्दिष्ट बाळगले आहे.
पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार इंग्लंडवर नऊ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर द. आफ्रिकेने न्यूझीलंडवर दोन धावांनी निसटता विजय मिळवला होता. गटात तिसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंड संघ आता वरचे स्थान पटकावण्यासाठी उत्सुक आहे. न्यूझीलंडला दोन्ही सामन्यात सांघिक खेळ करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी जलद अर्धशतके झळकावली. मात्र त्याचा फायदा अन्य फलंदाजांना उठवता आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2014 2:14 am

Web Title: icc world twenty20 new zealand seeks big victory
टॅग : New Zealand
Next Stories
1 सौरभ वर्मा उपांत्य फेरीत
2 महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्जच्या कर्णधारपदाला अलविदा?
3 सुनील गावसकरांकडे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्षपद
Just Now!
X