News Flash

ICC WT20I Ranking : शफाली वर्मा – स्मृती मंधानाच्या स्थानात घसरण

अंतिम फेरीतील खराब कामगिरीचा बसला फटका

महिला टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भारतीय महिला फलंदाजांनी भंबेरी उडाली. अंतिम सामन्यातील या खराब कामगिरीचा, भारतीय महिलांना आयसीसी क्रमवारीतही फटका बसलेला आहे. सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांचं टी-२० क्रमवारीतलं स्थान घसरलं आहे.

काही दिवसांपूर्वी पहिलं स्थान पटकावलेली शफाली वर्मा तिसऱ्या स्थानावर घसरलेली असून, स्मृती मंधाना सहाव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर आली आहे. अंतिम फेरीत दोन्ही फलंदाज अपयशी ठरल्या होत्या. साखळी फेरीत शफाली वर्माने आश्वासक फलंदाजी केली होती, मात्र अंतिम सामन्यात मोक्याच्या क्षणी शफाली झटपट बाद झाली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये शफालीला आपलं अव्वल स्थान गमवावं लागलं आहे. याव्यतिरीक्त मुंबईकर जेमायमा रॉड्रीग्जने आपलं नववं स्थान कायम राखलं आहे.

याशिवाय अंतिम फेरीत फटकेबाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या स्थानात सुधारणा झालेली दिसत आहे. बेथ मुनीने शफालीला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं असून…एलिसा हेली पाचव्या स्थानावर आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 6:09 pm

Web Title: icc wt20i ranking shafali varma smriti mandhana loose their spot psd 91
Next Stories
1 भारताचा बॉक्सर अमित पांघलला ऑलिम्पिकचे तिकीट
2 …तरच भारतीय संघात धोनीचा विचार होईल ! BCCI ची भूमिका कायम
3 Video : जेव्हा इरफानचा मुलगा आणि तेंडुलकर यांच्यात रंगते बॉक्सिंग मॅच
Just Now!
X