News Flash

पुढील हंगामात लिलाव झाल्यास CSK ने धोनीला सोडून द्यावं – आकाश चोप्रा

IPL च्या तेराव्या हंगामात धोनीच्या CSK ची निराशाजनक कामगिरी

२०२० वर्ष आणि आयपीएलचा तेरावा हंगाम हा महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपररकिंग्ज संघासाठी चांगला गेला नाही. एरवी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा संघ तेराव्या हंगामात साखळी फेरीतच बाहेर फेकला गेला. गुणतालिकेत चेन्नईला सातवं स्थान मिळालं. पुढील हंगामात धोनी खेळणार की नाही अशी काही दिवसांपूर्वी चर्चा सुरु असताना धोनीने आपण चेन्नईकडून खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. परंतू भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राच्या मते पुढील हंगामात BCCI ने Mega Auction करण्याचा निर्णय घेतल्यास चेन्नईने धोनीला सोडून द्यायला हवं.

“माझ्या मते पुढील हंगामासाठी लिलाव झाल्यास चेन्नईने धोनीला सोडून द्यावं. लिलाव झाल्यास पुढील ३ वर्षांसाठी तुम्ही त्या खेळाडूला संघात ठेवू शकता. पण धोनी तीन वर्ष तुमच्यासोबत राहणार आहे का?? चेन्नईने धोनीला संघात कायम ठेवलं तर त्यांना धोनीला १५ कोटी द्यावे लागतील. समजा धोनीने २०२२ पासून न खेळण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील पण त्या तोडीचा खेळाडू मिळणार आहे का?? मेगा ऑक्शनचा हाच फायदा असतो, तुम्ही तुम्हाला हवीतशी टीम तयार करु शकता. धोनीला सोडून दिल्यास पुन्हा RTM कार्डाद्वारे त्याला संघात परत घेण्याचा पर्याय खुला आहे. CSK ने धोनीला सोडलं तर ते त्यांच्यासाठीच चांगलं ठरेल.” आकाश चोप्राने आपल्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात मत मांडलं.

आताच्या आठही संघांपैकी चेन्नईच्या संघाला ऑक्शनची सर्वात जास्त गरज असल्याचंही आकाश चोप्राने म्हटलं. Daddy’s Army म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेन्नईला यंदा अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनुभवी खेळाडूंचं फॉर्मात नसणं संघाला चांगलंच भोवलं. त्यामुळे नवीन वर्षात नव्या आणि ताज्या दमाच्या खेळाडूंनिशी मैदानात उतरण्याचा धोनीचा कल असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 2:40 pm

Web Title: if mega auction happens for next season csk should release ms dhoni says aakash chopra psd 91
Next Stories
1 “ये क्या बवासीर…”; मुंबईकर खेळाडूने उडवली नव्या क्रिकेट नियमांची खिल्ली
2 नवीन वर्षात भारत-पाक संघ येणार समोरासमोर, बांगलादेशात रंगणार सामना
3 IND vs AUS: …म्हणून भारताविरूद्ध अनवाणी पायांनी मैदानात उतरणार ऑस्ट्रेलियन संघ
Just Now!
X