18 March 2019

News Flash

Video : भारतीय क्रिकेटपटू न आवडणाऱ्या चाहत्याला विराटचा ‘जय महाराष्ट्र’

हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेत

विराट कोहली हा सध्या क्रिकेटपासून काही दिवसांसाठी दूर आहे. तो आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह वाढदिवस साजरा करत आहे. म्हणूनच भारत विरुद्ध विंडीज टी२० मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पण असे असले तरीही कोहली हा कायम चर्चेचा विषय असतो. अशाच एका नव्या व्हिडीओमुळे कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोड आणि दुसऱ्या देशात जाऊन राहा, असा सणसणीत टोला कोहलीने एका चाहत्याला लगावला आहे. कोहलीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेत असून हा व्हिडीओ चांगलाच गाजत आहे.

एका व्हिडिओत विराट फोनमध्ये सोशल मीडियावरील कमेंट वाचत आहे. त्यात एका चाहत्याने विराटचे वर्णन वाजवीपेक्षा अधिक महत्व दिलेला फलंदाज असे केले आहे. तसेच विराटच्या फलंदाजीत काहीही खास नाही असे म्हटले असून मला भारतीय खेळाडूंपेक्षा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे फलंदाज अधिक आवडतात, असेही त्या चाहत्याने लिहिले आहे.

यावर कोहलीने त्याला सडेतोड उत्तर दिले. जर तुला भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर तुला जे क्रिकेटपटू आवडतात, त्या देशात जाऊन तू राहा आणि त्या क्रिकेटपटुंना पाठींबा दे, असे तो म्हणाला आहे.

First Published on November 7, 2018 6:00 pm

Web Title: if u dont like indian cricketers move outside india says virat kohli
टॅग Virat Kohli