05 June 2020

News Flash

युवराजने घेतली कर्करोगग्रस्त मुलांची भेट

हेजलशी साखरपुडा झाला असून, लग्न होईल तेव्हा सर्वांना समजेल.

युवराज सिंग

‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ विरुध्दच्या रविवारच्या सामन्यात २४ चेंडूंत ४२ धावा ठोकून हैदराबादला विजय मिळवून देणारा क्रिकेटपटू युवराज सिंगने अलिकडेच कर्करोगग्रस्त मुलांची भेट घेतली. मोहालीतील ‘पंजाब क्रिकेट असोशिएशन’च्या क्रिकेटच्या मैदानावर युवराजने रविवारची रात्र कर्करोगग्रस्त चिमुकल्यांसमवेत घालवली. लहानग्यांसमवेत स्वत:ही लहान झालेल्या युवराजने त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

युवीने कर्करोगाशी केलेल्या संघर्षाविषयी आणि त्याच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत प्रश्न मुलांनी त्याला विचारले. कर्करोगाविषयीचा आपला अनुभव कथन करताना तो म्हणाला, कर्करोगाशी दोन हात करावे लागत असल्याने क्रिकेटपासून दूर राहावे लागत असल्याची खंत होती. त्यावेळी क्रिकेटपटू अनिल कुंबळेने भेट घेऊन आपले मनोधैर्य वाढविल्याचे त्याने सांगितले. अशाप्रसंगी जीवन जगत पुढे जात राहाणे, याचेच नाव जीवन असल्याचा सल्ला त्याने मुलांना दिला. एका मुलाच्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, हेजलबरोबर अद्याप लग्न झाले नसून, साखरपुडा झाला आहे. लग्न होईल तेव्हा सर्वांनाच समजेल. दुसऱ्यांदा सहा चेंडूंवर सहा छक्के मारण्याचा कारनामा कधी साधणार, मुलांच्या या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, तुम्ही सर्व देवाकडे प्रार्थना करा, बघा! मी लवकरच दुसऱ्यांदा सहा छक्के मारतो.

कर्करोगाशी लढा देत असलेल्या एका आठ वर्षाच्या मुलाला तो केवळ १८ महिन्यांचा असताना त्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. युवराजसारखे खेळाडू आपल्यासाठी खूप मोठी प्रेरणा असल्याची भावना आता चौथ्या इयत्तेत शिकत असलेल्या या मुलाने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 3:33 pm

Web Title: ill hit six sixes again yuvraj singh to a kid who fought cancer
Next Stories
1 मुंबईच्या विजयात कृणाल चमकला
2 हैदराबादची बाद फेरीत मुसंडी
3 कोलकाताच्या गोलंदाजांची अग्निपरीक्षा
Just Now!
X