12 August 2020

News Flash

मी भविष्य वर्तवू शकत नाही -नदाल

‘‘तंदुरुस्त राहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

राफेल नदाल

‘‘तंदुरुस्त राहण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. क्षमतेला पूर्ण न्याय देत खेळणे माझ्या हाती आहे. मात्र ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याचे भविष्य मी वर्तवू शकत नाही,’’ अशा मोजक्या शब्दांत १४ ग्रँड स्लॅम विजेत्या राफेल नदालने आपल्या भावना व्यक्त केल्या. दुखापतींनी वेढलेल्या आणि यंदा लाल मातीवर अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागलेल्या नदालला सातत्याने ग्रँड स्लॅम जेतेपदाबाबत विचारले जात आहे. मात्र खणखणीत खेळाप्रमाणेच स्पष्टव्यक्त्या नदालने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. ‘‘नव्या हंगामाला सज्ज होताना आयपीटीएल हे उत्तम व्यासपीठ आहे. दिग्गजांविरुद्ध खेळण्याची संधी महत्त्वाची आहे. खेळ रंजक व्हावा आणि प्रक्षेपणाच्या दृष्टीने आयपीटीएलचे नियम योग्य आहेत,’’ असे नदालने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 6:44 am

Web Title: im not able to tell future nadal
टॅग Grand Slam
Next Stories
1 आयपीएल परदेशी संघांच्या पथ्यावर -कोहली
2 आनंदचा पराभव
3 महिन्याभरात मलिका झाली नाही, तर वर्षभरात होणे कठीण
Just Now!
X