News Flash

‘बीसीसीआय’ची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

या बैठकीत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा ठरवण्याविषयी तसेच परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी चर्चा करण्यात येईल.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक ठरवण्यासाठी तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांची मुंबईत या आठवडय़ात बैठक होणार आहे.

सद्यपरिस्थितीचा आढावा घेत ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी पोषक वातावरण आहे की नाही, यावरही चर्चा केली जाणार आहे. ‘आयसीसी’ने विश्वचषकाच्या आयोजनाविषयीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ला २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे.  या बैठकीत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा ठरवण्याविषयी तसेच परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी चर्चा करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 4:22 am

Web Title: important meeting of bcci in mumbai zws 70
Next Stories
1 जोकोव्हिचच्या रॅकेट भेटीने युवा चाहत्याचा आनंदोत्सव
2 आनंदवरील विजयात कामतला तंत्रज्ञानाची ‘मदत’
3 Euro Cup 2020 : सुपरस्टार लेवांडोव्स्की ठरला अपयशी, स्लोवाकियाची पोलंडवर सरशी
Just Now!
X