News Flash

डिसेंबर-जानेवारीत भारत-पाकिस्तान मालिका अशक्य

भारत-पाकिस्तान यांच्यात डिसेंबर-जानेवारी महिन्यात मालिका होऊ शकणार नाही

| December 24, 2015 12:56 am

शहरयार खान यांचा निर्वाळा
भारत-पाकिस्तान यांच्यात डिसेंबर-जानेवारी महिन्यात मालिका होऊ शकणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी अखेर जाहीर केले आहे. मात्र दोन देशांतील क्रिकेट मालिका पुढील वर्षी होईल, अशी आशा त्यांनी प्रकट केली.
डिसेंबर-जानेवारी महिन्यात संयुक्त अरब अमिराती किंवा श्रीलंकेमध्ये मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव आता अस्तित्वात येणे कठीण आहे, असे खान यांनी लाहोरला प्रसारमाध्यमांना सांगितले.
‘‘आता मालिका होणे अशक्य आहे. परंतु भविष्यात केंद्र सरकारचा हिरवा कंदील मिळवण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यशस्वी होईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ही परवानगी मिळाल्यास २०१६मध्ये भारत-पाकिस्तान मालिका घेणे शक्य होईल,’’ असे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:56 am

Web Title: impossible to india pakistan series in december january
टॅग : India Vs Pakistan
Next Stories
1 आयसीसी पुरस्कार २०१५: ऑस्ट्रेलियाचा स्मिथ ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू, भारताच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही
2 भारताच्या पुरुष संघाची जर्मनी, नेदरलँड्सशी गाठ
3 सानिया-मार्टिना जोडी यंदाची विश्वविजेती
Just Now!
X