पुण्याच्या अंकिता रैना हिने पन्नास हजार डॉलर्स पारितोषिकाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील एकेरीत विजयी प्रारंभ केला. तिने स्थानिक खेळाडू मिंग्यांग लिऊ हिच्यावर ६-३, ६-२ अशी मात केली.
अंकिता हिने पहिल्या सेटमध्ये सव्र्हिसब्रेक मिळवित ३-० अशी आघाडी घेतली. मात्र लिऊ हिने सलग दोन गेम्स घेत उत्सुकता निर्माण केली. तथापि अंकिता हिने पुन्हा सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळविले व हा सेट घेतला. दुसऱ्या सेटमध्ये अंकिताने सहाव्या गेमच्यावेळी सव्र्हिसब्रेक मिळविला व ४-२ अशी आघाडी घेतली. पुन्हा तिने आठव्या गेममध्ये सव्र्हिसब्रेक मिळवित हा सेट ६-२ असा घेत सामनाही जिंकला. तिची आता सहावी मानांकित हिरोको कुवाता हिच्याशी गाठ पडणार आहे. दुहेरीत तिने सोमवारीच दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 1:05 am