27 May 2020

News Flash

Ind A vs WI A : युवा शुभमन गिलचं द्विशतक, भारताची सामन्यावर पकड

गिलकडून नाबाद २०४ धावांची खेळी

छायाचित्र संग्रहीत आहे

वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यात भारत अ संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या डावात शुभमन गिलचं द्विशतक आणि त्याला कर्णधार हनुमा विहारीने शतकी खेळी करत दिलेली साथ या जोरावर भारताने ३६५/४ या धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. वेस्ट इंडिजला विजयासाठी ३७३ धावांचं लक्ष्य देण्यात आलं असून दिवसाचा खेळ संपताना यजमान संघ एकही विकेट न गमावता ३७ धावांपर्यंत मजल मारु शकला.

पहिल्या डावात विंडीजला १९४ धावांवर बाद केल्यानंतर भारताने सामन्यात सात धावांची आघाडी घेतली. सलामीचे ४ फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर शुभमन गिलने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. कर्णधार हनुमा विहारीच्या साथीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा नेटाने सामना करत गिलने धावांचा ओघ सुरुच ठेवला. तंत्रशुद्ध फटके खेळत शुभमनने आपलं शतक साजरं केलं. भारताचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघाकडून खेळत असताना प्रथम श्रेणी शतक झळकावणारा शुभमन सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा विक्रम मोडला.

आपल्या कर्णधारासोबत त्रिशतकी भागीदारी रचल्यानंतर शुभमन गिलने आपलं द्विशतकही झळकावलं. या कामगिरीसह शुभमन गिलने दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान पक्क केलं आहे.

शुभमन गिलने २४८ चेंडूचा सामना करत नाबाद २०४ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दरम्यान कर्णधार हनुमा विहारीनेही शुभमन गिलला चांगली साथ देताना नाबाद ११८ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2019 8:12 am

Web Title: ind a vs wi a shubhman gill slams a double ton in 3rd unofficial test psd 91
Next Stories
1 डेव्हिस चषक लढतीसाठी त्रयस्थ ठिकाणाचा पर्याय!
2 टेन-१० लीग, १०० चेंडूंचे सामने क्रिकेटसाठी हानीकारक!
3 भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक महासंघाची बंदी
Just Now!
X