News Flash

Video : आला अंगावर, घेतलं शिंगावर ! पॅट कमिन्सला शिखरचा दणका

IPL मधील महागड्या खेळाडूचं केलं हटके स्वागत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुलने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने आश्वासक धावसंख्या गाठली….मात्र इतर फलंदाजांनी या सामन्यात निराशा केली. शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडीने पहिल्या विकेटसाठी १३ धावांची भागीदारी केली, यानंतर रोहित शर्मा अवघ्या १० धावांवर माघारी परतला.

अवश्य वाचा – Ind vs Aus : भारताचा ‘गब्बर’ झाला एक हजारी मनसबदार

शिखर धवनने मात्र सुरुवातीच्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा चांगलाच समाचार घेतला. आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या कमिन्सने सुरुवातीच्या षटकांमध्ये बाऊंसर चेंडू टाकत धवनला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण शिखरनेही कमिन्सचं हे आव्हान स्विकारत त्याला आपल्या खास शैलीत दणका दिला. पाहा ‘गब्बर’च्या या अनोख्या फटक्यांचा व्हिडीओ…

दरम्यान, दरम्यान, रोहित शर्मा – शिखर धवन जोडी भारताला भक्कम सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली असली तरीही या जोडीने एक विक्रम आपल्या नावे जमा केला. एखाद्या संघाविरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या जोडीत रोहित-शिखर धवन ही जोडी दुसऱ्या स्थानी पोहचली आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : छोटेखानी खेळीत गब्बर-हिटमॅनची जोडी चमकली, मानाच्या यादीत स्थान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 4:53 pm

Web Title: ind vs aus 1st odi video watch how shikhar dhawan welcome pat cummins with his lofted shot psd 91
Next Stories
1 Video : विराटचा झॅम्पाने घेतलेला हा भन्नाट झेल पाहिला का?
2 Ind vs Aus : चौथ्या क्रमांकाची जागा ठरतेय विराटसाठी डोकेदुखी
3 IND vs AUS : ‘हिटमॅन’ स्वस्तात बाद; तरीही मोडला सचिन, विराटचा विक्रम
Just Now!
X