News Flash

टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, दुखापतग्रस्त जाडेजा मैदानाबाहेर

वैद्यकीय टीम करतेय जाडेजावर उपचार

वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय फलंदाजांचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच राहिलं आहे. पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी आणि रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने १६१ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. परंतू जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. महत्वाच्या क्षणी जाडेजाने २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या.

जाडेजाच्या फटकेबाजीने टीम इंडियाचा डाव सावरला असला तरीही संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. अखेरच्या षटकांत फलंदाजी करत असताना जाडेजाचा मांडीचा स्नायू दुखावला गेला. यानंतर फलंदाजीदरम्यान जाडेजाच्या हेल्मेटवर जोरात बॉल आदळल्यामुळे बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजाची तपासणी करत आहे. जाडेजाच्या जागेवर चहल बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने ३ तर स्वेप्सन-झॅम्पा आणि स्टार्क यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 4:01 pm

Web Title: ind vs aus 1st t20i ravindra jadeja hit on helmet did not came for fielding psd 91
Next Stories
1 झुंजार! दुखापतीनंतरही जाडेजानं कांगांरुंची केली धुलाई
2 ‘सर जाडेजां’च्या फटकेबाजीने बदललं सामन्याचं चित्र, धोनीचा विक्रम मोडला
3 पंजाबचा खेळाडू ऑस्ट्रेलियात करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X