ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत अॅडलेड कसोटी सामन्यात पहिल्या डावामध्ये अर्धशतक झळकावलं आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराटने सर्वातप्रथम चेतेश्वर पुजाराच्या साथीने संघाचा डाव सावरला.

चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराटने अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकवालं. कसोटी क्रिकेटमधलं विराटचं हे २३ वं अर्धशतक ठरलं. या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे. त्याने धोनीचा ८१३ धावांचा विक्रम मोडला.

नाणेफेक जिंकत विराटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉच्या अपयशाची मालिका सुरुच असून स्टार्कच्या गोलंदाजीवर तो शून्यावर माघारी परतला. यानंतर पॅट कमिन्सने मयांकचा त्रिफळा उडवत भारताला आणखी एक धक्का दिला. यानंतर विराटने महत्वपूर्ण भागीदाऱ्या करत भारताच्या डावाला आकार दिला.