News Flash

Ind vs Aus : पहिल्याच कसोटीत पृथ्वी शॉ शून्यावर बाद, नेटकरी संतापले

मिचेल स्टार्कने केली दांडी गुल, भारताची खराब सुरुवात

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे भारताचे सलामीवीर मैदानात उतरले. मुंबईकर पृथ्वी शॉने आपल्या अपयशी खेळाची मालिका पुढे सुरु ठेवली. मिचेल स्टार्कच्या दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतला.

पहिल्याच षटकात माघारी परतल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी पृथ्वीला ट्रोल केलं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करताना टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने शुबमन गिलऐवजी पृथ्वी शॉवर विश्वास दाखवत त्याला संघात स्थान दिलं होतं. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. पृथ्वी शॉनेही मिळालेल्या संधीचं सोनं न करता टीकाकारांच्या हातात आयतं कोलित दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 9:48 am

Web Title: ind vs aus 1st test prithvi shaw once again fails to impress out on duck fans troll him psd 91
Next Stories
1 Ind vs Aus : विराटने नाणेफेक जिंकली, भारत सामनाही जिंकणार…आकडेवारी पाहून तुम्हालाही बसेल विश्वास
2 ये नया इंडिया है ! पहिल्या कसोटीआधी आक्रमक शैलीबद्दल विराटचं वक्तव्य
3 राजीव शुक्लांकडे BCCI चं उपाध्यक्षपद जाण्याचे संकेत
Just Now!
X