भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या अॅडलेड कसोटी सामन्यात रविचंद्रन आश्निच्या गोलंदाजीवर कांगारुंच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पहायला मिळालं. भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपवल्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवातच खराब झाली. बुमराहने मॅथ्यू वेड आणि बर्न्स या सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडलं.

मार्नस लाबुशेनला भारतीय खेळाडूंनी ३ जिवदान दिल्यामुळे तो भारताच्या अडचणीत वाढ करणार असं वाटत असतानाच आश्विनने कांगारुंचं शेपूट आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. सर्वात आधी स्टिव्ह स्मिथला माघारी धाडत आश्विनने कांगारुंना तिसरा धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने आश्विनने ट्रॅविस हेड आणि कॅमरुन ग्रीनलाही बाद केलं. या ३ बळींच्या जोरावर आश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

जाणून घेऊयात कोण आहे या यादीत –

ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत असताना लाबुशेनने एक बाजू लावून धारत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला.