03 March 2021

News Flash

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर विराटला विश्वास, म्हणाला….

कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेकडे नेतृत्व

भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. विराटच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यामुळे तो भारतात परतणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थिती भारतीय संघाचं नेतृत्व मराठमोळा अजिंक्य रहाणे करणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘अजिंक्य राहणेनं याआधीही भारतीय संघाचं यशस्वी नेतृत्व केलं आहे. या दौऱ्यातही रहाणे स्वत:ला सिद्ध करेल. रहाणे एक चांगला फलंदाज आणि कर्णधार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी रहाणे घेईल असा मला पूर्ण विश्वास आहे. ‘ (आणखी वाचा : पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा)

अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत स्वत:ला कर्णधार आणि फलंदाज म्हणून सिद्ध करेल. या कसोटी मालिकेत भारतीय संघ कुठेही कमी पडणार नाही, याची सर्व काळजी अजिंक्य रहाणे घेईल, अशा शब्दात विराट कोहलीनं रहाणेवरील आपला विश्वास दर्शवला आहे. गुलाबी चेंडूवर खेळल्या जाणाऱ्या दिवसरात्र कसोटी सामन्यात आमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचं आव्हान असेल. गेल्या दौऱ्यापेक्षा यंदाचं आवाहन खडतर आहे. प्रत्येकवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर वेगवेगळी आव्हानं असतात. भारतीय संघ नेहमीच विदेशात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आसतोस असेही कोहली म्हणाला.


सध्याच्या भारतीय संघातील युवा शुभमन गिल यांनी आपल्या फलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. तो एक प्रतिभावंत खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो कशाप्रकारे खेळतो, हे पाहण्ययास मी इच्छूक आहे. पृथ्वी शॉ सराव सामन्यात अपयशी ठरला असला तरीही त्याच्याकडे कसोटी क्रिकेटचा अनुभव आहे. मात्र तो पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळतोय. त्यामुळे या प्रतिभावान खेळाडूंना संधी देऊ इच्छितो, असं कोहली म्हणाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 3:03 pm

Web Title: ind vs aus 2020 ajinkya rahane will prove himself as captain virat kohli believes nck 90
Next Stories
1 मोठी बातमी : पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा
2 केन विल्यमसनच्या घरी चिमुकलीचं आगमन
3 रात्र ऑस्ट्रेलियाची आहे… Day Night कसोटीमधील कांगारुंचा विराट विक्रम भारताला धडकी भरवणाराच
Just Now!
X