27 November 2020

News Flash

Ind vs Aus : चाहत्यांमध्ये मालिकेची उत्सुकता, दोन वन-डे आणि टी-२० मालिकेची तिकीटं संपली

२७ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात

२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. लॉकडाउनपश्चात भारतीय संघाचा हा पहिला दौरा असणार आहे. दोन्ही संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी मैदानावर मर्यादीत स्वरुपात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमधील हे द्वंद्व पाहण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक असून वन-डे आणि टी-२० सामन्यांची सर्व तिकीटं पहिल्याच दिवशी संपली आहेत.

“पहिल्या वन-डे सामन्यासाठी अंदाजे १९०० जागा रिकाम्या आहेत. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या वन-डे सामन्यांच्या तिकीटांसाठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. टी-२० मालिकेसाठीही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून तिकीटं संपली आहेत.” क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढत माहिती दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध मालिकेसाठी मैदानात एकूण क्षमतेच्या ५० टक्के…प्रेक्षकसंख्येला मान्यता दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 4:27 pm

Web Title: ind vs aus 2020 tickets for two odis all three t20is in australia sold out on first day of booking psd 91
Next Stories
1 IPL : KKR ने शुबमन गिलकडे संघाचं कर्णधारपद सोपवावं – आकाश चोप्रा
2 ०.१ सेकंदानं हुकलं कांस्य पदक; ऑलिम्पिकमध्ये अनवाणी पायांनी पळाले होते मिल्खा सिंग
3 एबी डीव्हिलियर्स झाला बाबा; बाळाचा फोटो सोशल मीडियावर केला शेअर
Just Now!
X