ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार फिंच यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. यानंतर राजकोटच्या मैदानावर दुसऱ्या वन-डे सामन्यातही, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि शिखर धवन या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकी भागीदारी केली.

या सामन्यात रोहित शर्माने वन-डे क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने आणखी एका विक्रमाची नोंद केली. सलामीवीर या नात्याने रोहितने वन-डे क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. १३७ डावांमध्ये रोहितने ही कामगिरी केली, आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमलाचा विक्रम यावेळी रोहितने मोडला.

दरम्यान दुसऱ्या वन-डे सामन्यात ऋषभ पंतच्या जागी मनिष पांडे तर शार्दुल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान मिळालं आहे.