भारतीय संघाला लागलेलं दुखापतींचं ग्रहण काही केल्या कमी होण्याचं चिन्ह दिसत नाहीये. पहिल्या सामन्यात फलंदाजीदरम्यान यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं. यानंतर दुसऱ्या सामन्यातक भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याचं समजतंय. शिखरच्या बरगड्यांना फलंदाजीदरम्यान दुखापत झाल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्याच्या जागेवर युजवेंद्र चहल बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला.

दरम्यान, पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात सावधपणे केली. दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला ४२ धावांवर बाद करत झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. शिखर धवन आपल्या शतकापासून ४ धावा दूर असताना रिचर्डसनच्या गोलंदाजीवर स्टार्कने त्याचा झेल घेतला