ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी सलग दुसऱ्या सामन्यातही सुरुच राहिली आहे. स्टिव्ह स्मिथने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई करत शतक साजरं केलं आहे. डेव्हिड वॉर्नर आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी करुन दिल्यानंतर स्मिथने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली.

लाबुशेनच्या साथीने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत असताना स्मिथने ६४ चेंडूत १०४ धावा पटकावल्या. त्याच्या या शतकी खेळीत १४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या शतकी खेळीच्या जोरावर स्टिव्ह स्मिथ भारताविरुद्ध सलग पाच वन-डे सामन्यांत ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. २०१४ साली न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने भारताविरोधात केली होती.

भारताविरोधात स्टिव्ह स्मिथची गेल्या ५ सामन्यांमधली कामगिरी –
६९, ९८, १३१, १०५, ५०

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने झेल पकडत स्मिथला माघारी धाडलं. स्मिथ माघारी परतल्यानंतरही लाबुशेनने फटकेबाजी सुरु ठेवत ऑस्ट्रेलियाला त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा गाठून दिला.