ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज आपल्या जुन्या फॉर्मात पुन्हा एकदा परतले आहे. सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने ३४० धावांपर्यंत मजल मारली. शिखर धवनचं या सामन्यातलं शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं….याचसोबत कर्णधार विराट कोहलीनेही या सामन्यात आपल्या फटकेबाजीने सर्वांना प्रभावीत केलं.

अर्धशतक झळकावल्यानंतर फॉर्मात आलेला कोहली शतक झळकावणार असं वाटत असतानाच फिरकीपटू अ‍ॅडम झॅम्पाने त्याला आपलं शिकार बनवलं. ४४ व्या षटकात झॅम्पाच्या गोलंदाजीवर विराटने उंच फटका खेळला…सुरुवातीला हा फटका थेट सीमारेषेबाहेर जाईल असं सर्वांना वाटत होतं…मात्र दुर्दैवाने सीमारेषेवर दोन ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी समन्वय दाखवत हा झेल टिपला आणि विराट माघारी परतला. झॅम्पाच्या गोलंदाजीवर बाद होण्याची विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही सातवी वेळ ठरली आहे. झॅम्पाने सर्वाधिक वेळा विराटला आपलं शिकार बनवलं आहे.

पाहा कशा पद्धतीने बाद झाला विराट कोहली…

विराट कोहलीने शिखर धवनच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी रचत भारतीय डावाला आकार दिला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत विराटने ७६ चेंडूत ७८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता.