भारतीय संघात पर्यायी सलामीवीरांची भूमिका निभावणारा लोकेश राहुल सध्या आपल्या जुन्या फॉर्मात परतला आहे. लंकेविरुद्ध टी-२० मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलला भारतीय संघात स्थान मिळालं. आपल्याला मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा उचलत फिंचने संघातल्या आपल्या स्थानावर पुन्हा एकदा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हेल्मेटला पॅट कमिन्सचा चेंडू लागला.

अवश्य वाचा – Video : वा पांडेजी वा ! वॉर्नरला माघारी धाडणाऱ्या मनिष पांडेचा भन्नाट प्लाईंग कॅच

या घटनेनंतर पंतला दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं. त्याच्या जागेवर लोकेश राहुलने यष्टीरक्षणाची भूमिका बजावली. राहुलनेही फलंदाजीत गरज असताना, ८० धावांची खेळी करत संघाला ३०० चा टप्पा ओलांडून दिला. यानंतर रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर राहुलने यष्टींमागे सुरेथ यष्टीरक्षण करत फिंचला माघारी धाडलं. राहुलने ज्या पद्धतीने चपळाई दाखवत फिंचचा बळी घेतला तो पाहण्यासारखा होता. पाहा हा व्हिडीओ….

दरम्यान, पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात सावधपणे केली. दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला ४२ धावांवर बाद करत झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

अवश्य वाचा – Video : कोहलीच्या मनसुब्यांवर झॅम्पाचं पाणी, पुन्हा एकदा ठरला शिकार

या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. शिखर धवन आपल्या शतकापासून ४ धावा दूर असताना रिचर्डसनच्या गोलंदाजीवर स्टार्कने त्याचा झेल घेतला. यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही फारशी चमक दाखवू शकला नाही. यानंतर विराटने लोकेश राहुलच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्येच्या दिशेने नेलं. यादरम्यान विराट कोहलीने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. विराट आपलं शतक झळकावणार असं वाटत असतानाच झॅम्पाने त्याचा अडसर दूर केला. त्याने ७८ धावांची खेळी केली.

अवश्य वाचा – Ind vs Aus : सलामीवीर रोहित शर्माचा विक्रम, हाशिम आमलाला टाकलं मागे