भारतीय संघाने दुसऱ्या वन-डे सामन्यात फलंदाजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे ३४० धावांचा पल्ला गाठला. रोहित शर्मा, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. भारताने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारुंची सुरुवात खराब झाली.

अवश्य वाचा – Video : कोहलीच्या मनसुब्यांवर झॅम्पाचं पाणी, पुन्हा एकदा ठरला शिकार

पहिल्या सामन्यात द्विशतकी भागीदारी करणाऱ्या फिंच आणि वॉर्नर जोडीला दुसऱ्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. चौथ्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मनिष पांडेने उडी मारत एका हातात झेल घेत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. पाहा मनिषच्या या भन्नाट कॅचचा व्हिडीओ…

तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर मनिष पांडेला भारतीय संघात जागा मिळाली होती. मात्र फलंदाजीत त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. दोन धावा काढून तो माघारी परतला. मात्र क्षेत्ररक्षणादरम्यान पांडेने आपलं कर्तव्य चोख बजावत कांगारुंना धक्का दिला.