26 February 2021

News Flash

ऋषभ पंतकडून कांगारुंची धुलाई, धडाकेबाज शतकासह केलं दणक्यात पुनरागमन

दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे ४७२ धावांची आघाडी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील तीन दिवसीय सराव सामन्याचा दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. ऋषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी झळकावलेल्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३८६ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडे सध्या ४७२ धावांची आघाडी असून तिसऱ्या दिवशी भारतीय संघ निर्णयाक विजयाचा प्रयत्न करेल असा अंदाज आहे. पहिल्या डावात बुमराहच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर १९४ धावांपर्यंत मजल मारलेल्या भारताने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०८ धावांत गुंडाळला. मोहम्मद शमी आणि नवदीप सैनीने प्रत्येकी ३, बुमराहने २ तर सिराजने १ बळी घेतला.

दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉने पुन्हा निराशा केली असली तरीही मयांक अग्रवाल आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकं झळकावत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मयांकने ६१ तर गिलने ६५ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर हनुमा विहारीने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाचा डाव सावरला. ३८ धावांची खेळी करुन अजिंक्य रहाणे माघारी परतला. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या खराब फलंदाजीमुळे चर्चेत असलेल्या ऋषभ पंतला आपला फॉर्म सिद्ध करण्याची संधी होती, आणि या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल करत ऋषभने धावांचा ओघ वाढवला. एका बाजूने हनुमा विहारी धावफलक हलता ठेवत असताना ऋषभने चांगली फटकेबाजी केली. ७३ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांसह त्याने १०३ धावा केल्या. हनुमा विहारीसोबत केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसाअखेरीस सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. हनुमा विहारीही दिवसाअखेरीस १०४ धावांवर नाबाद होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि भारताचे गोलंदाज काय रणनिती आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 9:05 pm

Web Title: ind vs aus 2nd practice game day 2 rishabh pant and hanuma vihari ton helps india to get in driver seat psd 91
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाचा असा करा पराभव; द्रविड-कुंबळेनं भारतीय संघाला दिला गुरुमंत्र
2 Video : ब्रावोला मैदानातच शिवीगाळ, सुटला होता सोपा झेल
3 Video : बुमराहनं षटकार लगावत ठोकलं अर्धशतक; विराट पाहातच राहिला….
Just Now!
X