News Flash

दस का दम…! भारतानं मोडला पाकिस्तानचा विक्रम

भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर सहा गड्यांनी मात केली. भारताचा हा लागोपाठ दहावा विजय आहे. सलामीवीर फलंदाज शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर भारतानं १९५ धावांचं आव्हान यशस्वी पार केलं. या विजयासह तीन सामन्यांची मालिका भारतानं २-० ने जिंकली आहे. या विजयासह भारतीय संघानं पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

भारतीय संघाचा हा लागोपाठ दहावा विजय आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान संघानं लागोपाठ ९ सामने जिंकले होते. पाकिस्तान संघानं २०१८-१९ दरम्यान लागोपाठ ९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. आता २०१९-२० मध्ये भारतानं हा विक्रम मोडला आहे. आफगाणिस्तान संघानं २०१८-१९ मध्ये लागोपाठ १२ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघानं आणखी लागोपाठ तीन सामने जिंकल्यास सर्वाधिक लागोपाठ सामने जिंकण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होईल..

२०१९ मध्ये भारतानं विडिंजचा मुंबईत पराभव केला होता. त्यानंतर २०२० च्या सुरुवातीला श्रीलंकाविरोधात टी-२० मालिका पार पडली होती. यात पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यात भारतानं विजय संपादन केला होता. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लागोपाठ पाच टी-२० सामने जिंकले होते. आता ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन सामन्यात पराभव करत दहा विजयाची नोंद केली आहे.

दरम्यान दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करत सामन्याचं चित्र बदलून टाकलं. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने बाजी मारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 5:28 pm

Web Title: ind vs aus 2nd t20i team india break pakistans big t20i record nck 90
Next Stories
1 डावखुऱ्या फलंदाजांमध्ये ‘गब्बर’ ठरला उजवा, महत्वाच्या यादीत अव्वल स्थानी झेप
2 शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घ्या नाहीतर खेलरत्न पुरस्कार परत करेन – विजेंदर सिंह
3 पहिल्या सामन्याचा हिरो, दुसऱ्या सामन्यात ठरला झिरो ! चहलच्या नावावर नकोसा विक्रम
Just Now!
X