News Flash

पाकिस्तानचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याची भारताला संधी

दुखापतग्रस्त ऑस्ट्रलियाचा पराभव करण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल

टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील पाकिस्तान संघाचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं पहिला सामना जिंकत पाकस्तान संघाच्या विक्रमाची बरोबरी केली होती.  २०१८ मध्ये पाकिस्तानने सलग ९ सामने जिंकत हा कारनामा केला होता.  आज, भारत आणि ऑस्ट्रेलिया याच्यादरम्यान दुसरा टी-२० सामना होणार आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया संघातील महत्वाचे खेळाडू अनुपस्थितीत आहे. याचा फायदा घेत भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल यात शंका नाही. आज, सिडनी येथील दुसरा टी-२० सामन्यात भारतीय संघानं जिंकल्यास लागोपाठ १० आंतरराष्ट्रीय टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होईल. याआधी पाकिस्तानने २०१८ मध्ये लागोपाठ ९ सामने जिंकण्याचा कारनामा केला होता.

जुलै २०१८ मध्ये पाकिस्ताननं तिरंगी मालिकेत आधी झिम्बाब्वेला आणि मग ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केलं होतं. यानंतर युएईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला तीन-तीन वेळा पराभवा स्विकारावा लागला. कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवत भारतीय संघानं पाकिस्तानच्या या विक्रमाशी बरोबरी केली. आता दुसरा सामना जिंकत भारतीय संघ नवीन विक्रम करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरले. टी-२० मध्ये लागोपाठ सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आफगाणिस्तान संघाच्या नावावर आहे. आफगाणिस्ताननं २०१८-१९ मध्ये लागोपाठ १२ सामने जिंकले होते.

२०१९ मध्ये भारतानं विडिंजचा मुंबईत पराभव केला होता. त्यानंतर २०२० च्या सुरुवातीला श्रीलंकाविरोधात टी-२० मालिका पार पडली होती. यात पहिला सामना पावसाने वाया गेल्यानंतर उर्वरित दोन्ही सामन्यात भारतानं विजय संपादन केला होता. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं लागोपाठ पाच टी-२० सामने जिंकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 12:50 pm

Web Title: ind vs aus 2nd t20i virat kohlis team india set to break pakistans big t20i record nck 90
Next Stories
1 Ind vs Aus : मराठमोळ्या अजिंक्यला सूर गवसला, सराव सामन्यात झळकावलं शतक
2 विराट-रवी शास्त्री जोडगोळीवर कैफचं टीकास्त्र, म्हणाला…
3 विराट कोहलीवर भडकला सेहवाग, म्हणाला…
Just Now!
X