पहिल्या सामन्यात शरमेने मान खाली घालायला लावणारा पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने दमदार पुनरागमन केलं. प्रथम गोलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला संपूर्ण १९५ धावांत माघारी धाडला. पहिल्याच दिवसाच्या खेळात अवघ्या ७३ षटकांमध्ये यजमान द्विशतकी मजलही न गाठता बाद झाले. वरच्या फळीतील मार्नस लाबुशेन आणि ट्रेव्हिस हेड या दोघांनी चांगली कामगिरी केली होती, पण मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे संघ स्वस्तात माघारी परतला. या सामन्यात एक मजेशीर असा प्रसंग घडला.

ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत होता. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात ७०व्या षटकात यजमानांनी अवस्था ८ बाद १७७ अशी होती. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व राखल्याने मैदानावर फारशी फटकेबाजी दिसत नव्हती. अतिशय कमी धावांमध्ये संघाचे ८ गडी माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियने फलंदाज आपली विकेट वाचवत जमेल तितका वेळ खेळपट्टी राखत होते. टी२० क्रिकेटच्या जमान्यात अशा प्रकारचा खेळ पाहणं काहीसं कंटाळवाणं असतं असं चाहते बरेचदा दिसतात. पण आज चक्क मैदानातच याचा प्रत्यय आला. खेळपट्टीवर फारसं काही घडत नसल्याने कंटाळलेल्या पंचांनी जागेवर उभ्या-उभ्या जांभई दिली.

पाहा व्हिडीओ-

पंचांनी केलेली ही कृती चतूर कॅमेरानने लगेच टिपली. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ख्रिसमसची मोठी सुट्टी साजरी करून जेव्हा तुम्ही कामावर येता तेव्हाची तुमची अवस्था, असं कॅप्शन देत ही पोस्ट करण्यात आली आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर लाइक केला जातोय.